Aniket Udage

Just another WordPress.com weblog

Archive for the ‘Love’ Category

कधी कधी खुप आनन्द देतं

Posted by aniketudage on July 31, 2008

कधी कधी खुप आनन्द देतं
न मागताही सुख देतं,
पण अच्यानक हसता हसता रडवतं
आयुष्य…हे असंच असतं…..

आपण बरंच काही ठरवतो
आयुष्याचे आराखडे बांधतो,
पण एका वळणांवर सगळ काही थांबतं
आयुष्य…हे असंच असतं……

भुतकाळातल्या गोड आठवणी
वेड मन आठवत रहातं
पण त्या मनाला फ़सवुन रडवतं
आयुष्य…हे असंच असतं…….

सुखाबरोंबरच दु:खहीं देतं
कधीही भरुन न येणां-या
भळभळणां-या जखमाहीं देतं
आयुष्य…हे असंच असतं…….

आयुष्यात खुप काही मिळतं
त्यातल बरंच काही नको असतं
पण जे हवं असतं तेच मिळत नसतं
आयुष्य…हे असंच असतं…….

Posted in Love | 1 Comment »